सध्या शिक्षकांमधील चांगुलपणा,सामाजिक भान हरवत चालला आहे, अशी ओरड होत असते.पण काही शिक्षक समाजासमोर दीपस्तंभासारखे काम करताहेत.आदिवासी भागात जन्माला आलेल्या एका तरुण शिक्षकाने नोकरी लागल्यापासून समाजसेवक बाबा आमटे यांच्या 'आनंदवन' संस्थेच्या संलग्नित महारोगी सेवा समितीला हजार रूपये पाठवून चांगुलपणा जपला आहे. त्यामुळे इतर शिक्षकांनी हा आदर्श घेण्यासारखा आहे.
एकनाथ रामकिसन नैताम असे त्या शिक्षकाचे नाव आहे. काटगाव ता.तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत सध्या ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.किनवट तालुक्यातील शामपूर (मिनकी) या आदिवासी पाड्यात एकनाथ यांचा जन्म झाला. आजही या पाड्यात त्यांचे आई-वडील,भाऊ राहतात. आदिवासी पाड्यात आजही ना शिक्षणाची सोय आहे ना कोणत्या सेवा सुविधा. जंगल हेच त्यांचे विश्व. एकनाथ नैताम हे त्यातील एक घटक. हालाखीच्या परिस्थितीमुळे एकनाथ यांना लहानपणी गाई,गुरे ,बकऱ्या चरण्याठी रानात घेऊन जावं लागे. रानमोळ हिंडताना किनवट च्या घनदाट जंगलाचे दर्शन होत असे. सोबत ते बाराखडीचे पुस्तक घेऊन जात. यातून त्यांना मुळाक्षराची ओळख झाली. बाराखडीच्या पुस्तकातील छोट्या छोट्या गोष्टी ते वाचू लागले. शिक्षणाचा लळा लागू लागला पण घरात कुणीच शिकलेले नव्हते. त्यात अठराविश्व दारिद्रय. ना भाऊ,ना,वडील,ना काका शिकलेला होता. अशा अंधारकमय जीवनात प्रकाशाची वाटा पाहणाऱ्या एकनाथ यांच्या अडाणी आई-वडिलांनी आपल्या मुलाला शिकवून मोठे करण्याचा खूणगाठ बांधली. जमेल तसे एकनाथांच्या धडपडीला साथ देऊ लागले. आई-वडिलांच्या अथक प्रयत्नामुळे एकनाथांना तलाईगुंडा (ता.किनवट) येथील शासकीय आदिवासी आश्रमात प्रवेश मिळाला. आश्रमात राहून एकनाथ यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यापुढचा मार्ग त्यांना निवडाचा होता. आपल्या कुटुंब व बांधवांना नवी दिशेने न्यायचे असेल तर पुढील शिक्षण घेणे आवश्यक होते. दहावीनंतर त्यांनी शिक्षक होण्यासाठी डीएडचा मार्ग पत्करला. पैशाअभावी हे शिक्षण पूर्ण करणे अवघड होते. डीएडची प्रवेश फी भरण्यासाठी व्याजाने पैसे काढावे लागले. वैजापूर जि.औरंगाबाद येथील अध्यापक विद्यालयात अत्यंत हालखीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१२ साली इटकळ ता.तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले.
नोकरीला लागल्यापासून 'आनंदवना'ला का?पैसे पाठवत आहे. याविषयी सांगताना एकनाथ म्हणाले,"माझी घरची परिस्थिती बेताची होती,संस्कार काय असतात हे मला माहीत नाहीत. आश्रमात शिक्षणासाठी आलो तेव्हा लाजरा होतो, आपल्यापेक्षा काही लोक अधिक पटीने सुधारले आहेत याची जाणीव झाली. तिथे माझ्यावर खूप चांगले संस्कार झाले.आम्ही सर्व आदिवासी मुलं-मुली एकत्र भावडांप्रमाणे राहायचो. इथे घरच्याप्रमाणे वागणूक दिली गेली. समाजसेवक बाबा आमटे व त्यांच्या कुटुंबियांनी आदिवासी पाड्यात केलेल्या कामामुळे हा सामाजिक बदल घडून येतोय हे हळूहळू कळत गेले. त्यामुळेच आमटे कुटुंबिय माझे आयडॉल आहेत. लहानपणी आदिवासी मुलांचे पाहिलेले दु:ख,वेदना मनात टोचत होत्या. आपण प्रवाहाबरोबर असल्याची जाणीव होत होती. पण आमच्या समाजात आमुलाग्र बदल घडवणारे डॉ.बाबा आमटे हे आमचे दैवत आहे. डॉ.प्रकाश बाबा आमटे यांच्या 'प्रकाशवाटा' पुस्तकाने आणखीन प्रभावित झालो. आदिवासींच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत असलेले समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांच्यामुळे आदिवासी पाड्यातील मुलांना शिक्षण मिळाले. त्यामुळे आपण शिकून शिक्षक होऊ शकलो. शिक्षक झाल्यापासून न चुकता महारोगी सेवा समिती वरोरा जि.चंद्रपूर या संस्थेला आर्थिक मदत देण्याची जबाबदारी स्वीकारली. अविरतपणे ही मदत चालू ठेवणार असल्याचे एकनाथ नैताम यांनी सांगितले.
दरम्यानच्या काळात एकनाथ यांच्या भावाच्या लग्नपत्रिकेवर समाजसेवक डॉ.प्रकाश बाबा आमटे यांच्या कार्याची माहिती दिली होती. हा संदेश पै-पाहुण्यांना आवडला होता. एकनाथ हे शाळेच्या कामातही आघाडीवर आहेत. ते एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून इटकळ येथे ठसा उमठवला आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी विविध परिक्षेत गुणवान ठरले आहेत.
देवभूमी केरळमध्ये प्रलयंकारी जलसंकट आले. आपत्तीग्रस्त बांधवांना मदत म्हणून जि.प. प्रा .शाळा काटगाव ता. तुळजापूर येथील इ.३री तुकडी (ब )मधील विद्यार्थांनी केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मूल्यवर्धन या उपक्रमांतर्गत पूरग्रस्तांसाठी काहीतरी सहकार्य करावे या भावनेतून खारीचा वाटा उचलला आहे. यामध्ये वर्गशिक्षक श्री. एकनाथ नैताम यांनी १ हजार रूपये व सर्व विद्यार्थ्यांनी मिळून २०० रु असे एकूण १२०० रुपयांची मदतनिधी केरळ सरकारकडे आपत्ती व्यवस्थापन निधी म्हणून पाठवले आहे. विद्यार्थ्यांना सहकार्याची भावना समजावी व त्यांनी एकमेकांना नेहमी सहकार्य करावे,हा आपला हेतू असल्याचे नैताम यांनी सांगितले.
एका साध्या शिक्षकाने आपण जे भोगलो, ते भोग आपल्या बांधवांना येऊ नये, या संवेदनेतून एकनाथ नैताम यांनी उचलेले पाऊल कौतुकास्पद तर आहेच शिवाय अनुकरणीय देखील सुध्दा आहे.
©विकास पांढरे,९९७०४५२७६७
एकनाथ नैताम - ९५५२००५२७२
( सदर लेख १२ जानेवारी २०१७ रोजी दैनिक पुढारी, सोलापूर मध्ये प्रसिद्ध झाला आहे. शेवटचा मुद्दा नाव्याने भर घातला आहे.)
एकनाथ रामकिसन नैताम असे त्या शिक्षकाचे नाव आहे. काटगाव ता.तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत सध्या ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.किनवट तालुक्यातील शामपूर (मिनकी) या आदिवासी पाड्यात एकनाथ यांचा जन्म झाला. आजही या पाड्यात त्यांचे आई-वडील,भाऊ राहतात. आदिवासी पाड्यात आजही ना शिक्षणाची सोय आहे ना कोणत्या सेवा सुविधा. जंगल हेच त्यांचे विश्व. एकनाथ नैताम हे त्यातील एक घटक. हालाखीच्या परिस्थितीमुळे एकनाथ यांना लहानपणी गाई,गुरे ,बकऱ्या चरण्याठी रानात घेऊन जावं लागे. रानमोळ हिंडताना किनवट च्या घनदाट जंगलाचे दर्शन होत असे. सोबत ते बाराखडीचे पुस्तक घेऊन जात. यातून त्यांना मुळाक्षराची ओळख झाली. बाराखडीच्या पुस्तकातील छोट्या छोट्या गोष्टी ते वाचू लागले. शिक्षणाचा लळा लागू लागला पण घरात कुणीच शिकलेले नव्हते. त्यात अठराविश्व दारिद्रय. ना भाऊ,ना,वडील,ना काका शिकलेला होता. अशा अंधारकमय जीवनात प्रकाशाची वाटा पाहणाऱ्या एकनाथ यांच्या अडाणी आई-वडिलांनी आपल्या मुलाला शिकवून मोठे करण्याचा खूणगाठ बांधली. जमेल तसे एकनाथांच्या धडपडीला साथ देऊ लागले. आई-वडिलांच्या अथक प्रयत्नामुळे एकनाथांना तलाईगुंडा (ता.किनवट) येथील शासकीय आदिवासी आश्रमात प्रवेश मिळाला. आश्रमात राहून एकनाथ यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यापुढचा मार्ग त्यांना निवडाचा होता. आपल्या कुटुंब व बांधवांना नवी दिशेने न्यायचे असेल तर पुढील शिक्षण घेणे आवश्यक होते. दहावीनंतर त्यांनी शिक्षक होण्यासाठी डीएडचा मार्ग पत्करला. पैशाअभावी हे शिक्षण पूर्ण करणे अवघड होते. डीएडची प्रवेश फी भरण्यासाठी व्याजाने पैसे काढावे लागले. वैजापूर जि.औरंगाबाद येथील अध्यापक विद्यालयात अत्यंत हालखीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१२ साली इटकळ ता.तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले.
![]() |
| शिक्षक एकनाथ नैताम |