सोमवार, २० फेब्रुवारी, २०१७

परिचारक, ओमबाबा...!

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळूनही सैनिकांना देशाच्या संरक्षणासाठी लढावे लागते. याच भारत मातेसाठी हजारो जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. आपला देश, देशातील जनता सुरक्षित राहण्यासाठी अहोरात्र पहारा देणारे जवान, सीमेवर लढणारा प्रत्येक जवान हा भारतीयांचा श्वास आहे. हा श्वास ज्यावेळी बंद होईल त्यावेळी  काय अनर्थ होईल, याची कल्पना करवत नाही. १९४७-४८, १९६२,१९७२,१९९९ च्या युध्दात मराठी मातीतले अनेक जवान शहीद झाले आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर भागात‘घरटी एक तरी मिलिटरीवाला पाहिजेच!’ या ध्येयानं झपाटलेल्या असंख्य गावांच्या वेशीवर हुतात्मा सैनिकांच्या नावानं कमानी उभारल्या गेल्या आहेत.  काही गावांची ओळख तर‘फौजीवाल्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. सैनिक, वीर जवान आणि नागरिक यांच्यामध्ये प्रेमाचा, स्नेहाचा सेतू बांधण्याचे काम हे नेत्यांचे असते. नेते, कलाकार, लेखक नव्हे तर समाजातील सर्व घटक जर जवानांविषयी आदरभाव, अभिमान बाळगून असतील तर राष्ट्रप्रेम आणखीन ज्वलंत होते.

 परवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राचारात आमदार  प्रशांत परिचारक यांनी भारतीय जवानांच्या पत्नीबद्दल कथित वक्तव्य करून टीकेची झोड ओढून घेतलीे. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी माफी ही मागितली आहे. पण सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेऊन काही घटक या घटनेचा बाजार करून राजकीय लाभ मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. परिचारक यांच्या वक्तव्याने जवानांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांची पक्षातून हाकलपट्टी करावी, त्यांनी आमदार पदाचा राजीनामा द्यावा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या सर्व मागण्या रास्त आहेत.  पण पुढे काय ?

आमचे दिवगंत ओमबाबा पुरी यांनी देखील जवानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. समाज आणि माध्यमांनी याची तितकी दखल घेतली नाही. आमच्या डाव्या मित्रमंडळींनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. शेवटी पुरी यांनी डोळ्यात अश्रू आणून माफी मागितली. एवढेच नव्हेतर मागे  कन्हैयाने  भारताचे जवान काश्मिरी स्त्रीवर बलात्कार करतात,असे वक्तव्य केले होते. ही गोष्ट किती जणांना माहित आहे. हा संशोधनाचा विषय आहे.
उलट पाकिस्तान धार्जिण भारतीय जवानांचा ड्रेस घालून तेथील स्त्रीवर बलात्कार करतात. ही गोष्ट माहित असून आम्ही सोयीस्कर दुर्लक्ष केलोे.
© विकास पांढरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...