शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

शेतकरी आत्महत्या की खून ?

  • देशभरातील वाढत्या अतिरेकी काभारतात प्रत्येक तासाला 18 ते 25 आत्महत्यांची नोंद आजमितीस होत आहे. विशेष म्हणजे  महाराष्ट्रात गेल्या दोन दशकापासून वर्षापासून शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. मुळात शेतकर्‍यांचा आत्महत्या  सर्वात मोठा जागतिक संशोधनाचा विषय होऊन बसलेला आहे. या आत्महत्या रोखण्यासास  शासनस्तरावरून  कितीही प्रयत्न होत असेल तरी,  विषयाकडे गांभीर्यपणे लक्ष देण्यास कोणालाही वेळ मिळत नसल्याची खंत आहे.  त्यामुळे शेतकर्‍यांच्या ‘आत्महत्या नसून खूनच’ आहे असे संबोधावे लागेल.  जागतिक आत्महत्याविरोधी दिनानिमित्त घेतलेला हा वेध. 

  •  जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण व त्यामुळे वाढणार्या  ताण-तणावातून  शेतकर्‍यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यास कोणालाच सवड-फुरसत  मिळत  नाही, तर  कोणीही तसा प्रयत्नही करीत नाही.आत्महत्या, शब्दोच्चार देखील भीतिदायक वाटतो तितकाच   गंभीर. आत्महत्येस प्रवृत्त करते मन.  मनाभोवती अत्यंत दाट खिन्नता, डिप्रेशन व नाराजीचे वलय निर्माण होते. या जगात, समाजात, कुटुंबात आता जीवन जगण्यातील अर्थच संपला, म्हणून स्वत:ला संपण्यासाठी मन प्रवृत्त होऊन आत्महत्या केली जाते. 

  •  यात प्रामुख्याने भरडला जातोय तो जगाचा पोशिंदा अर्थात शेतकरी.  दुष्काळी फेरा, नापिकी, कर्ज,  मुलांचे शिक्षण,  लग्न यामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा कणाच मोडला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाय योजना  राबवल्या जात असताना आत्महत्यांचा आकडा उत्तरोत्तर वाढत चालला आहे. वर्षभरात देशातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण 40  टक्क्यांनी वाढल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.
  • महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली असून त्यापाठोपाठ तेलंगणाचा क्रमांक येतो. 

  •  अनुशेषाचे योग्यवाटप नाही

  • सर्वाधिक  आत्महत्या या मराठवाडा आणि विदर्भात होत आहेत.  या भागाचा विकास करण्यासाठी वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहेत.  पण अनुशेषाचे योग्यवाटप होत नसल्या कारणामुळे येथील शेतकरी विकासापासून वंचित आहेत. या भागातील शेतकर्‍यांच्या मुलभूत गरजा कोणत्या आहेत .
  • याकडे गांभीर्याने घेणे हे अजून तरी तेथील स्थानिक नेत्यांना सुचले नाही. मराठवाडा, विदर्भ या भागांविषयी तेथील कोणताच नेता पोट तिडकीने बोलल्याचे येथील जनतेला आठवत नाही. हे कोणाचे दुर्दैव? प्रशासन यावर उपायात्मक मार्ग काढण्यासाठी असफल ठरली आहे.

  • पाऊस झाला की दुर्लक्ष

  • पाऊस झाला की सरकार शेतकर्यांच्या आत्महत्या विसरून जातो.  तिथेच खरी गल्लत होते.  शेतकर्यांच्या आत्महत्येवरील उपाययोजना ही दीर्घकालीन असली पाहिजे.  त्यासाठी वेगळी तरतूद केली पाहिजे.  ते पैसे काटेकोरपणे खर्च केले पाहिजेत.  तरच आजचे चित्र बदलू शकते.

  • आत्महत्येचा फुगा वाढतोय

  •      आपल्या देशात ब्रिटिश काळापासून ते आजपर्यंत   दुष्काळ पडत  आहे. 1972 साली लोकशाहीतील सर्वात मोठा दुष्काळ पडला.  त्यानंतर नव्वदच्य ा दशकापासून दुष्काळाने पाठ फिरवली नाही.  2015-16  सालात दुष्काळाने शीग गाठली आहे.  दुष्काळे कामे झाली,  पण विदर्भ व मराठवाड्यात  आत्महत्येचे सञ सुरूच आह 1995 ते 2011 पर्यंत देशात 2 लाख 940 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो सांगतो,  यापैकी महाराष्ट्रातील आत्महत्येची आकडेवारी 53 हजार 818 इतकी आहे.

  • आत्महत्येची ठळक प्रमुख कारणे 

  •  नापिकी व कर्जबाजारीपणा
  •   सातत्याने उद्भभवत असलेली दुष्काळी परिस्थिती 
  •  खासगी संस्था, सावकार यांच्या वसुलीच्या तगादा
  •  मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडता न येण
  •   मुलाला शिकविले परंतु त्याला नोकरी न लागणे
  • सोलापूर जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येचे लोण
  • शेजारच्या मराठवाडा विभागात शेतकरी आत्महत्येने थैमान घातले असताना, याचे लोण सोलापूरातही पोहोचले आहे. सततच्या दुष्काळ व नापिकीमुळे सधन जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आत्महत्या हा विषय विदर्भ व मराठवाड्यात सीमित न राहता प. महाराष्ट्रात पोहोचले आहे.


  • महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या  आकडेवारी

  • वर्षे                  संख्या
  • 2000              3022
  • 2001              3536
  • 2002              3695
  • 2003              3836
  • 2004              4147
  • 2005             3926
  •   2006             4453
  • 2007                4238
  •   2008              3802
  • 2009               2872
  • 2010               3141
  • 2011             3337
  • 2012             4300
  • 2013              3146
  • 2014              4004
  • 2015              1841
  • (जागतिक आत्महत्याविरोधी दिन विशेष.दै.पुढारी10सप्टेंबर 2016)
  • सोलापूर : विकास पांढरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...