आज वि.वा.शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट' नाटकाच्या प्रयोगाला ४३ वर्षे पूर्ण झाले. नाटकांविषयी मी २७ मार्च २०१६ रोजी सोलापूर तरूण भारत मध्ये लिहिलेला लेखाची ही एक आठवण.
मराठी नाटयसृष्टीतील अजरामर नाटक म्हणजे नटसम्राट टू बी ऑर नॉट टू बी... जगावं की मरावं, कुणी घर देता का घर असा जबरदस्त मर्मभेदी संवाद अनेक अभिनयाची जुंगलबंदी असलेल्या, मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटक नटसम्राट 23 डिसेंबर 1970 रोजी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
सत्तरच्या दशकात वि.वि.शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक रंगभूमीवर आणले. त्यानंतर या नाटकाने एक नवा इतिहास निर्माण केला.नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकर या पात्राला अधिक उंची मिळाली. ख्यातनाम अभिनेता डॉ.श्रीराम लागू यांनी अप्पासाहेब बेलवकर यांची भूमिका साकारली होती. लागू यांनी अभियनातला मानदंड निर्माण केला. वि.वा.शिरवाडकर यांनी निर्माण केलेल्या नटसम्राट या नाटकाचा मूलाधर शेक्सपिअरच्या किंगलेअर नाटकाचा आहे. सत्तरच्या दशकातील हे नाटक मराठी नाटय रसिकांचा ठाव घेते. डॉ.श्रीराम लागू, दत्ता भट या रंगकर्मींनी हे नाटक एका उंचीवर नेउन ठेवले. सतीश दुभाषी,चंद्रकांत गोखले, यशवंत गोखले,मधुसूदन कोल्हटकर, प्रभाकर पणशीकर, राजा गोसावी, लक्ष्मण देशपांडे, उपेंद्र भट यांनी ही नाटक करण्याचा प्रयत्न केला होता. गणपतराव बेलवलकर या व्यक्तिरेखेला आयाम दिला तो लागू यांनीच. वृध्द नायकाची होणारी होरपळ आणि परवड सांगणारे हे नाटक आहे. कावेरी,नलू, नंदा, शारदा, सुधाकर, विठोबा, सुहास ही पात्रे देखील तितक्याच ताकदीची आहेत.
अभिनयाची कारकीर्द ऐन भरात असताना कायम प्रकाशझोतात राहणारा नट उतारवायत प्रकाशझोतापासून दूर जातो आणि त्याच्या नशीबी अंधारवाट येते. त्याच्यावर भरभरून प्रेम करणारा रसिक -प्रेक्षकच नव्हेतर त्याची
स्वत:ची मुलेही त्याला स्वत:पासून दूर करतात. आपल्या लोकांशी आणि रंगभूमीशी नातं तुटलेला हा नटसम्राट आपल्या पत्नीला सोबत घेवून या जगापासून दूर जात हालखीचं जीवन जगतो. या वृध्द नायकाची शोकांतिका म्हणजे नटसम्राट नाटक. डॉ.श्रीराम लागू यांनी वृध्द नायकाची केलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले आहे.
1970-80 च्या दशकात या नाटकाचे विक्रमी प्रयोग झाले. जगाच्या कानाकोपऱ्यात प्रयोग झालेले हे एकमेव नाटक. लागू यांनी आपला जिवंत अभिनय ओतून नटसम्राट आणि आप्पासाहेब ऊर्फ गणपतराव बेलवलकर या पात्रास घरोघरी नेले. लागूंच्या तोडून निघणारे स्वगत प्रेक्षकांना घायाळ करून सोडले होते इतके नाटक लोकप्रिय झाले. मुळातच लागू हे रंगभूमीवरचे कलाकार. लागू यांनी आकाश पेलताना, आंधळयाची शाळा, इथे ओशाळला मृत्यू, आधे अधुरी, एकच प्याला, उद्याचा संसार,कन्यादान, किरवंत, गिधाडे, दूरचे दिवे,पुण्यप्रभाव, वेडयाचे घर उन्हात, सुंदर मी होणार, राजमुकुट, सूर्यास्त अशा अनेक नाटकांत त्यांनी भूमिका केली. प्रसिध्द दिग्दर्शक जब्बार पटेल लागू यांच्या अभिनयाविषयी म्हणतात.
"पाहिलेला माणूस,हिमालयाची सावली या नाटकात महत्वाची भूेमका साकारल्या आहेत. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता यर्इिल. भूमिका जिवंत करणारा हा वाडमयप्रचार लागूंच्या बाबतीत अगदी खरा ठरतो.डॉ. लागू हे आमचे गुरू आहेत". त्यांचा रंगमंचावरील वाघासारखा वावर,त्यांची स्वगते, आवाजाची गोलकार परंगणी,देहबोली ओतून टाकतात. जीवंत अभिनयविश्व उभे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अभिनयात आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने ते जागतिक रंगभूमीवरचे तोडीचे कलाकार आहेत असा नट होणे नाही.शिरवाडकर यांच्या लेखनात म्हणजेच संवादात जी ताकद आहे, त्याचा प्रभाव नाटकावर जाणवाते. या नाटकाची नुसती स्वगते अंगावर रोमांच उभे करतात. डॉ.जब्बार पटेल यांनी केलेल्या वर्णनावरून लागू यांच्या अभिनयाची महती लक्षात येते.
या वृध्द नायकाची शोकांतिक रूपेरी पडद्यावर आणण्याचे कार्य दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले. जगावं की मरावं हाच एक खरा प्रश्न आहे. मी आप्पासाहेब बेलवकर. उभा आहे इथा हिमालयासारखा अभद्य. या दमदार संवादाने नाना पाटेकर यांनी आप्पासाहेबांना आणखीन अमर केले. हा संपूर्ण चित्रपट वेगवेगळया सौंदर्याने नटला आहे.
शिरवाडकरांच्या भाषेचा कणा नादमय आहे. प्रसंगानुसार, पोट तिडकीनुसार, वैतागानुसार, क्रोधानुसार,आनंदाने तर कधी तर दु:खाचे उद्गार उमटतात. त्यामुळे हा चित्रपट रसिकांना अस्वस्थ करून जातो. नानाच्या तोंडून निघणारा संवादच पाहा ना.
" आता फक्त म्हणून उरला आहे. आपली पोरं चांगली आहेत.सरकार आपलं म्हातारपण वाईट आहे. वय झालेली म्हातारी माणसं पिशाच्चंच असतात. माणसं वाईट नसली तरी म्हातारपण वाईट असतं. दोष तुमचा नसेल,तुमच्या वयाचाही असेल.....मी पैसे चोरले सरकार? सरकार, तुला माहीत आहे. माझ्या क्रोधाला पाय नाहीत. हात नाहीत, लुळापांगळा आहे... गटरात तडफडणारं. मी पैसे चोरले?नाही. सरकार, मी रागवणार नाही नी तुम्हाला सांगून ठेवतो. मी रडणार नाही. डोळयांत आसवं जमायला लागली तर खेळ मारून डोळयांच्या खाचा करीन संभाजीसारखा. तुझ्यासारख्या आळयीसमोर रडणार नाही. मी पैसे चोरल? मी पैसे चोरले?". नानांनी आपल्या अभिनय कुशलतेने हा संवाद अधिक जिवंत केला आहे. त्यामुळे हा चित्रपट शोकात्मिक तेच्या उंचीवर नेउन पोहोचला आहे. हा चित्रपट पाहताना रसिकांना कुठेही कंटाळा येत नाही. मुळात नाना तस मराठी रंगभूमीवरचा शिलेदार नट. पाहिजे जातीचे, हामिदाबाईची कोठी, महासागर,अडाण्याचा गाडा,पुरूष, भाउ मुरारराव या नाटकात नानाची अभिनयाची कस लक्षात येते. नानाच्या अभिनयाबाबत नाटयसमीक्षक वि.भा.देशपांडे एके ठिकाणी म्हणतात, "त्याच्या कारकीर्दकडे बघताना असं वाटत की त्यांचं सामर्थ्थ कशात आहे? किंवा बलस्थान कशात आहे? याचा विचार केला नानाचा जो स्वर आहे तो स्वर खर्जात लावण्याची जी पध्दती आहे. ती त्याचं बलस्थान आहे आणि असा खर्जातला स्वर, खालच्या पट्टीतला लियाया पेलणारा नट असू शकतात असं नाही.संथ लयीनं, सहजतेने नाना अभिनय करतो हेच त्याच्या अभिनयाचे बलस्थान आहे".
एकूणच नाना हा कितीही मोठा नट असला तरी तो मूळ रंगभूमीवरचा माणूस आहे. डॉ.श्रीराम लागू हे जागतिक रंगभूमीवरचे महत्वाचे शिलेदार आहे. नटसम्राट नाटकांनी मराठी नाटकांना दिलेली मोठी शिदोरी आहे.
लेखक विकास पांढरे,९९७०४५२७६७
(साभार २७ मार्च २०१७ रोजी सोलापूर तरूण भारतमध्ये प्रसिध्द झालेला हा लेख.)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा