पवित्र रिश्ता, कालाय तस्मय नम:, या दर्जेदार मालिकांपासून ते फोर्स, राजवाडा, यंदा कर्तव्य आहे, अशा हिंदी मराठी चित्रपटात आपल्या अभिनव कुशल अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे सोलापूरची कन्या आणि उस्मानाबाद जिल्ह्याची सून अश्विनी तडवळकर होय. आज ती अभिनय आणि पत्रकारिता या दोन्ही पातळ्यांवर यशस्वी झाली आहे.

- पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर हे कला आणि संस्कृतीचे केंद्र समजले जाते. या शहराने जुन्या काळापासून सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला आहे. सोलापूरच्या मातीतून आजही अनेक गुणी कलावंत जन्माला येत आहेत, हे आपण पाहत आहात. त्यातील एका समर्पित अभिनेत्रीचे नाव म्हणजे अश्विनी तडवळकर.
अश्विनी सध्या सोलापूरच्या दैनिक 'दिव्य मराठी' मध्ये सांस्कृतिक विभागाची पत्रकार आहे. ती पत्रकार असली तरी तिच्या अंगात अभिनय भिनला आहे. तिला बालपणापासून नाटकाची आवड आहे. ती अनेक नाटकात आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. महाविद्यालयीन काळात तिच्या कलेला वाव मिळाला. याच काळात तिची अमिर तडवळकर या कसदार अभिनेत्यासोबत ओळख झाली.पुढे या जोडीने अनेक नाटके केली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकले.
- अश्विनीचा नाटक,चित्रपट आणि पत्रकार या माध्यमाशी संबंध आला. या तिन्हीं क्षेत्रात ती यशस्वी पणे काम करत आहे. विशेष म्हणजे घर,कुटुंब, मुलं सांभाळून ती नाटकाची तालीम असो वा राज्य नाट्य स्पर्धा यासाठी कार्यमग्न असते.
 |
| अभिनय कुशलता |
आतापर्यंत तिने 'कालाय तस्मय नमः', 'हसत खेळत लागली वाट', 'पवित्र रिश्ता' आणि 'बडे अच्छे लगते हो' या मराठी-हिंदी मालिकांमधून पडद्यावर दिसली तर जॉन अब्राहम यांचा 'फोर्स'या हिंदी चित्रपटात आणि मुक्ती, शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित केदार शिंदे दिग्दर्शित 'राजवाडा' या मराठी चित्रपटात अभिनयाची झलक दाखवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. इतकेच नव्हेतर 'यंदा कर्तव्य आहे', 'तुझी तुझा नवरा माझी बायको' या चित्रपटात विशेष छाप टाकली आहे. गेली पंचवीस वर्षे तिचा हा प्रवास सुरु आहे.
- पुण्यात पार पडलेल्या ५६ व्या राज्य नाट्य महोत्सवाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिला अभिनयाचे रौप्यपदक रौप्यपदक मिळाले. सोलापूर केंद्रातून प्रथम आलेल्या लेखक राजेंद्र पोळ लिखित आणि अश्विनी तडवळकर दिग्दर्शित 'वारूळ' या नाटकातील राणी या पात्रांसाठी तिला पारितोषिक मिळाले. राज्यातील २१ केंद्रांतून प्रथम आलेल्या अव्वल नाटकातून बाजी मारत तिला हे यश प्राप्त करता आले. यावरून अश्विनीच्या अभिनय आणि दिग्दर्शनाची कल्पना लक्षात येते.
 |
| सन्मान |
 |
| 56 व्या राज्य नाट्य स्पर्धेत समर्पित नाट्यमंदिर ने सादर केलेल्या 'वारूळ' या नाटकास प्रथम परितोषिक मिळाले. |
 |
| यश |
 |
| अभिनय |
 |
| समर्पित नाट्य शाळेची ही मुलं म्हणजे उर्जेचा भांडार आहेत |
कला,नाट्य,चित्रपट आणि पत्रकारितेची जाण असलेल्या या समर्पित अभिनेत्री
 |
| झलक |
. कला ही अंगभूत असावी लागते
पत्रकारितेची जाण
 |
| पत्रकारिता |
गेली अकरा वर्षे पत्रकारितेत ती काम करते आहे. दिव्य मराठीत गेल्या पाच ते सहा वर्षांपासून विविध विषयांवर लेखन केल्यानंतर आज पहिल्यांदा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाने पालकांची लूट या विषयावर लेखनाने तिला सशक्त पत्रकार बनवले. या लेखाला याविषयाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
 |
| पुरस्कार |
अश्विनी व अमिर तडवळकर
- सोलापुरात अनेक तरुण- तरुणी कलावंत होण्यासाठी धडपडत असतात. या तरूणांना कलेचे व्यासपीठ आणि धडे देणारी संस्था सोलापुरात नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी अश्विनी व अमिर तडवळकर यांनी 'समर्पित' या संस्थेची निर्मिती करून अनेक होतकरू तरुण-तरुणींना नाटकाचे विशेष धडे देत आहेत.
- "कला ही अंगभूत असावी लागते तरच ती प्रेक्षकांच्या काळजापर्यत पोहोचते. कला म्हणजे काय?अभिनय,संवाद, संघर्ष याचे शास्त्रोक्त पद्धतीने धडे देण्यासाठी आम्ही नवराबायको मिळून 'समर्पित' संस्थेची निर्मिती केली आहे."असं अश्विनी तडवळकर हिने सांगितले. अशा या गुणसंपन्न अभिनेत्रीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ...!
@ विकास पांढरे,नवी मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा