दीड एक वर्षापूर्वी मयुरी खैरे ही तरूणी भेटली. गंभीर आजाराला तोंड देत असतानाही सकारात्मक दृष्टीनं आनंदी आयुष्य जगणारी आणि मध्य प्रदेशात शिंपल्याची यशस्वी शेती करणाऱ्या मयुरीची कहाणी संघर्षमय आहे. आज तिचा वाढदिवस. तिच्याविषयी हा शब्दप्रपंच.
![]() |
| मयुरी खैरे |
बुलढाणा जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात मयुरीचा जन्म झाला. अकरावीत असताना तिला किडनीच्या आजारांनी ग्रासले.ऐन उमेदीची चार पाच वर्षे आजारपणात निघून गेली. आजारपणात तिनं काँलेलजा न जाता पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. याकाळात मयुरीनं अनेक महनीय व्यक्तीचे चरित्रे वाचून काढली. समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांच्या 'प्रकाशवाटा' पुस्तकानं तिच्यातली ऊर्जा बाहेर पडली,आणि दिशाच बदलली. पदवीनंतर ती आजारपणाला विसरून गेली. पुण्यात स्पर्धा परीक्षा अभ्यास वर्गाला जाऊ लागली. इथेच तिला समविचारी मित्रांची ओळख झाली. या तरुणांनी ऊर्मी नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. ही संस्था समाजाच्या हितासाठी काम करु लागली. एकदिवशी तिच्या वाचनात 'मोत्याची शेती' हा लेख आला. या लेखाने ती झपाटून गेली. तिच्या घरी शेती नव्हती,शेतीबद्दल तिला फारसे काही माहिती ही नव्हते. तरीही तिने ही नवी वाट धरली.
मयूरी सांगत होती- तेव्हा एक चित्रपट उभा राहिला. "सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. माझ बालपण ही सर्वसमान्यचं होत. हसण्या-बागडण्यात कशी १५-१६ वर्ष निघून गेली कळलच नाही. वयाच्या १७व्या वर्षी आयुष्यानी खूप मोठी कलाटनी घेतली. मी ११वीत असताना मला किडनीच्या आजारानी ग्रासलं आणि नंतर दिवसागणिक माझं आजरपण वाढतच गेलं. सगळे उपचार करुन झाले. अगदी दिल्लीच्या मोठ-मोठया हॉस्पिटलच्या ही पायऱ्या झिझवूण झाल्या होत्या. माझ्या उपचारासाठी माझ्या मम्मी-पप्पानी पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही."
आयुष्याचा तो टप्पा ज्यावेळी आपण सगळं डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन जिद्दीनं ,मेहनंतीनं आयुष्याला आकार देण्यासाठी धडपडत असतो. तेच उम्मीदीचं ४-५ वर्ष माझ्या आजारपनात निघून गेले. मला प्रचंड त्रास व्हायचा जो सहन न होण्या पलीकडचा होता. त्यामुळं मला आयुष्य नकोस झाल होतं. आपण आपलं आयुष्य संपवावं असंही विचार त्यावेळी माझ्या डोक्यात यायचा. याकाळात मला माझ्या फॅमिलीने खूप आधार दिला. माझ्या जगण्याची संपत चाललेली इच्छा त्यांनी परत जगवली आणि मला दुसरा जन्म दिला."
पुढची कहाणी तर आशादायी तर आहेच शिवाय इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर माणूस काय बदल घडवू शकतो याचे उत्तम उदाहरण मयुरी खैरे आहे.
आजारपणातल्या दिवस कसे गेले याबाबत मयूरीने कथन केले. "काहीतरी विरंगुळा म्हणून मी त्या ४-५ वर्षाच्या आजरपणाच्या काळात प्रचंड वाचन केले. ते. वाचनामुळं मला सिंधुताई सपकाळ, डॉ.प्रकाश बाबा आमटे आणि अजून अशा बऱ्याच लोकांच्या कार्याची माहिती मिळाली. त्याचवेळी आपण ही असचं काहीतरी कराव हा ध्यास मनानं घेतला. त्यानंतर माई आणि प्रकाशबाबांना भेटण्याचं भाग्य मला लाभले आणि माझा तो ध्यास पक्का झाला.
४-५वर्ष आजारपणात गेल्या नंतर मी बरी झाले. आजरपणातच मी माझी डिग्री पूर्ण केली. कॉलेजला न जाताच फक्त पेपर देऊन मला ही डिग्री मिळाली होती. त्यामुळं त्या क्षेत्रात आपण काहीतरी करावं, असं फारस वाटत नव्हतं. मागच्या ४-५ वर्षात माझ्या आजारपणामुळं मम्मी-पप्पाना ही खूप त्रास झाला होता. मला होणारा त्रास पाहुण त्यांना ही प्रचंड वेदना होत होत्या. याची जाणीव मला होती. त्यामुळं मला आता असन काहीतरी करायचा होत ज्या मुळे माझ्या मम्मी-पप्पा ना माझ्यावर गर्व वाटावा, माझ्या नावानं त्यांना ओळखलं जाव अस मला कही तरी करायच होत.
आज सारखच त्याही वेळी सिविल सर्विसेजच फार वेड होत. त्या वेडा पासून मला ही दूर राहता आल नाही. पोस्ट मिळवून आपल्याला समाजासाठी काहीतरी करता येईल, त्याचबरोबर आपल्या घरच्याना ही खूप आंनद होईल अस मला वाटत होत. त्यामुळं मी MPSC करण्याचा निर्णय घेतला आणि पुणे गाठल.एका नामवंत क्लासेसमध्ये एडमिशन घेतले. त्यानंतर वर्षभर फक्त क्लास आणि अभ्यास हेच आयुष्य बनून गेलं होत. अभ्यासात सातत्य असल्यामुळं १-२ परीक्षाची पहिली पायरी ही मी क्लियर करू शकले होते. पण तरी सुध्दा त्यात मन कही लागत नव्हतं. आतला आवाज वेगळचं काहीतरी सांगत होता. त्याच वेळी आम्ही काही फ़्रेंड्सनी मिळून पुण्यात एक NGO सुरु केला. 'उर्मी' त्याच नाव.उर्मीच्या अंतर्गत आम्ही 'digital literacy'वरती काम करायला सुरुवात केली. अल्पावधितच आमच्या कामला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. काम वाढत गेलं. तस तस अनेक चांगल्या लोकांच्या ओळखी होत गेल्या, समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या इतर मंडळीशी आपसूकच भावबंध जुळत गेले.
उर्मीच काम करताना एक नवीनच उर्मी तना-मनात दाटून आली होती. काम करताना आंनद तर मिळत होताच पण त्याही पेक्षा समाधान मिळत होत, जे कुठल्याही गोष्टीत मोजता येण्यासारख नव्हतं. ए्कीकडं MPSCचा अभ्यास आणि दुसरीकडं उर्मीच काम हे सगळ सुरु असतानाच. एक दिवस पेपरमध्ये मी 'मोत्यांची शेती' या विषयावर लेख वाचला, मोती समुद्रात असलेल्या शिंपल्यानमध्ये तयार होतात. इतकेच काय ते मला माहित होते. पण तो लेख वाचून कळालं की आपण मोत्यांची शेती करू शकतो. तो लेख वाचला आणि मी भारावून गेले, आपण हेच काम करायचं असं मला सारख वाटायला लागल होत. काय करायच,कसं करायच काहीच माहित नव्हतं. आपल्याला हेच काम करायच हे मात्र मनात पक्क झालं होत.
मोत्यांची शेती सत्यात कशी आणले याविषयी सांगताना मयुरी म्हणाली, घरी शेती नव्हती, मला शेती बद्दल फारसं काही माहिती ही नव्हतं. पण तरी फक्त तो एक लेख वाचून माझा मोत्याच्या जगातला प्रवास सुरु झाला. घरी सगळ्यांना समजून सागंण थोड़ अवघड होत पण तेही मी केल. मग काय पुण्याला राम-राम ठोकून ,मी रानावनाची वाट चालू लागले. सुरुवातीला काय कराव ,कसं कराव काहिच माहिती नव्हतं. पण हळूहळू माहिती मिळत गेली. CIFA (Central institute of fresh water Aquaculture) ची माहिती मिळाली. मग मी भूवनेश्वर गाठलं.पण तिथं जाऊन ही काही कारणामुळं मला मोत्यांच्या शेतीच प्रशिक्षण घेता आल नाही.
![]() |
| शेती प्रयोग |
पण तिथं CIFA च्या campas मध्ये एक व्यक्ती भेटले, ज्यानी 'pearl farming'.(मोत्यांच्या शेती)वर बराच रिसर्च केला होता आणि ते स्वतः मोत्यांची शेती करत होते. त्यांनी मला प्रत्यक्ष त्यांच्या 'pearl fram' मध्ये नेऊन त्यांचा 'pearl farm' दाखवला आणि त्याबद्दल सगळी माहिती दिली. "तू हे काम नक्की करू शकतेस हा विश्वास त्यांनी मला दिला."
त्या दिवसापासून आजपर्यंत मार्गदर्शक म्हणून क़ायम ते माझ्या सोबत आहेत. आता मला मार्गदर्शन करणारी अनुभवी व्यक्ती माझ्याकडं होती. मी ही माझ्याकडून होईल तेव्हा ही माहिती जमवली होती. त्यामुळं मोत्यांची शेती करायची कशी? हा प्रश्न तर सुटला होता. पण आपण मोत्यांची शेती करायची कुठे? हा प्रश्न मात्र अजूनही ही अनुत्तरित होता. माझ्या गावाकडं बऱ्याच ठिकाणी जागा शोधून झाली, पण मला हवी तशी जागा काही मिळाली नाही. त्यातच एक दिवस इंदौरला राहत असलेल्या माझ्या एका फ्रेंडचा फोन आला. असंच थोडसं इकडचं तिकडचं बोलून झाल्यानंतर मी त्याला मोत्यांच्या शेतीबद्दल सांगितल. त्याला ही मोत्यांच्या शेतीची कल्पना खूप आवडली आणि क्षणाचाही विलंब न करता ,तो म्हणाला तू मध्य-प्रदेश में.यहा अपने खेत मे ये मोती की खेती करेगे, मग काय दुसऱ्याच दिवशी मी इंदौर गाठल, शुभमच्या फँमिलीला ही मोत्यांच्या शेतीची कल्पना आवडली. 'बच्चों आपको जो करना है वो करो अपने खेत मे ! असं म्हणून शुभमच्या फॅमिलीनी आम्हाला प्रोत्साहान दिलं आणि माझा मोत्यांच्या शेतीचा प्रोजेक्ट मध्यप्रदेश मध्ये सुरु झाला. पेपर मध्ये आलेला लेख वाचून सुरु झालेला माझा हा प्रवास मला मध्य प्रदेश मध्ये घेऊन आला. माझ्या वेडाने राज्याच्या सीमा तर ओलाडल्याच त्याचबरोबर भाषेच्या ही सीमा ओलाडल्या. शुभमची फॅमिली ही पाटीदार फॅमिली आहे.जे मध्य प्रदेशच्या निमाडी भागात राहत असल्यामुळं सगळंच निमाडी भाषेत बोलायचे. निमाडी सुरुवातीला मला कळत नव्हती आणि त्याना मराठीचा ही गंध नव्हता. त्यामुळं सुरुवातीला शुभम आमच्यात ट्रांसलेटर म्हणून असायचा तो मला निमाडीच भाषांतर हिंदीत करुन सांगायचा. राज्याना सीमा होत्या, भाषेला सीमा होत्या. पण मनाला मात्र कुठलीच सीमा नसते. हे इथे आल्यावर मला उमजलं आणि मी पाटीदार फॅमिलीची सदस्य कधी झाले. ते मला ही कळलंच नाही.
एक ते दीड वर्षाच्या रिसर्च नंतर फाइनली आमचं काम मध्य प्रदेश मध्ये सुरु झाल. शेतात शेततळ करुन आम्ही त्यात ऑपरेशन करुन शिंप टाकत होतो. इथे जवळच नर्मदा नदी असल्यामुळं आम्हाला तिथून शिंप मिळत होती.नर्मदेतून शिंप आणून त्याना आम्ही शेतात दोन छोट्या छोट्या शेततळयात ठेवायचो. नर्मदेच्या पाण्यात असलेलं तापमान आणि वातावरण आपण आपल्या शेततळयात कृत्रिम पद्धतीने तयार करायचो. ज्यामुळे शिंप ना त्या शेततळयात रीलैक्स फील व्हायचं.त्यामुळं त्याचा mortality rate (मरण दर) कमी होतो. त्या नंतर आठ दिवसांनी या शिंप च ऑपरेशन करुण त्यात आपण 'nuclear' (मोत्यांच सीड) इंप्लांट करतो, त्या नंतर आठ दिवस या ऑपरेशन केलेल्या शिंपी ना औषधी-गोळ्या देऊन त्यांची योग्य ती काळजी घेतली जाते. आठ दिवसानंतर या शिंपी ना मेन टैंक मधे शिप्ट केल्या जाते. या शिंपी मध्ये एक मासाळलेला प्राणी असतो. जो आपण शिंप मध्ये इम्प्लांट केलेल्या सीड वरती एक Enzymes सोडते जे या प्राण्याच्या शरीरात तयार होते.
८-१० महिन्याच्या कालावधीत डिझायनर मोती तयार होतो. तर गोल मोती तयार व्हायला १५-१८ महिन्याचा कालावधी लागतो. या संपूर्ण कालावधीत आपल्याला या शिंपची योग्य ती काळजी घ्यावी लागते,असं मयुरी म्हणाली.
![]() |
| गोल मोती तयार व्हायला १५-१८ महिन्याचा कालावधी लागतो |
या कहाणीमधून मयुरीची यशोगाथा समोर येते. आजारपणाशी दोन हात करत शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची वाट धरत मोत्यांची शेती करण्याचा केलेला ध्यास सत्यात उतरून दाखवला. तिची ही कहाणी आजच्या तरुण-तरुणींना लाजवेल अशी आहे.
आपल्या शेती प्रयोगाच्या यशस्वीतेचे गमक सांगताना मयुरी म्हणाली, "आम्ही आता पर्यंत एक मोत्याचं पिक यशस्वीरित्या काढलं आहे.बाजारात डिझायनर मोत्यांची प्रति नग सरासरी किंमत २५०-३००रुपये आहे.आमचा आज पर्यंतचा खर्च वजा करता. चांगल्या प्रकारे प्रॉफिट राहिल आहे. अगदी काही हजारांच्या भांडवलावर सुरु होणारी ही मोत्यांची शेती लाखोच्या घरात प्रॉफिट कामवून देते. त्यामुळे "low investment and high profit"चा हा bussiness आहे.असं म्हणायला हरकत नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याकडे वळावे आणि आपली आर्थिक स्थिती सुधारावी हा आमचा प्रयत्न आहे.
येव्हडयावरच न थांबता आम्ही या सारख्याच अनेक नव-नवीन गोष्टी वर रिसर्च करत आहोत. ज्यामुळं शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून आपल्याकडं अनेक पर्याय तयार होतील.
![]() |
| मोत्यांची शेती |
"Low investment.. high profit" हा उद्देश्य डोळ्या समोर ठेवून "spirulina framing, colour fish farming and bell paper(colour capsicum) farming" या प्रोजेक्ट वरती सध्या आम्ही रिसर्च करत आहोत. मागच्या दीड-दोन वर्षाच्या कालावधीत या सगळ्या प्रोजेक्टच्या कामासाठी भारत भर फिरून झालंय, या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या ओळखी झाल्या. ज्याचा फायदा मला माझ्या प्रोजेक्टसाठी कायम होतो आहे.
सध्या आमचा प्रोजेक्ट मध्य-प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यामध्ये सुरु आहे. लवकरच महाराष्ट्रात ही प्रोजेक्ट सुरु करण्याचा मानस आहे. व्यवसायाविषयी सल्ला देताना मयुरी सांगते, कुणीही मोत्यांची शेती करू शकते. मोत्यांची शेती फक्त शेतातच करता येते अस नाही,तर आपण आपल्या घरी गच्चीवर सुद्धा करू शकतो. मोत्यांची शेती करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते पाण्याची मुबालकता. पाणी मुबालक प्रमाणात असेल तर आपण कुठे ही मोत्यांची शेती करू शकतो. "side business" म्हणून या व्यवसायात उतरू शकतो. दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील तरुण -तरुणांनी या व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करावा.
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य-प्रदेश या तीन राज्यात मोत्यांची शेती प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. ज्या मध्ये आम्ही मोत्यांची शेती कशी करावी याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करतो. आमच्या या प्रयत्नामुळे शेतकरी बांधवाला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करू शकलो तरी आम्ही आमच्या या प्रयत्नात यशस्वी झालो असन आम्ही समजू असा लाखमोलाचा संदेश मयुरीने दिला.
आजारपण आणि यशाच्या श्रेयाविषयी मयुरी सांगताना म्हणाली, ४-५ वर्षाच आजारपण आणि त्या नंतरचा माझा आज पर्यंतचा प्रवास खूप अवघड होता. वाटेत असंख्य अडचणी आल्या पण मी कधीच थांबले नाही. त्यामुळेच मी इथपर्यंत पोहचू शकले. त्यामुळं माझं सगळ्यांना हेच सांंगण आहे. आयुष्यात दु:ख आलं म्हणून चालन सोडू नका ,आणि त्या दु:खाला कवटाळून बसू नका. ज्यावेळी एक दार आपल्यासाठी बंद होत त्याच वेळी एक खिड़की आपल्यासाठी उघडत असते, पण ते बंद झालेल दार बघत बसण्यात आणि त्याच दु:ख करण्यात आपण इतके गुंग होतो की आपल्याला आपल्या समोर असून ही ती उघडलेली खिडकी दिसत नाही. कृपया अस करू नका. आंनद आणि दु:ख हे आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत. ते येत-जात राहणारच हे कायम लक्षात ठेवा आणि चालत रहा.
माझ्या या यशाचं श्रेय कुणाला द्यायच झाल तर ते मी माझ्या फॅमिलीला देईल. विशेष म्हणजे माझ्या पप्पाना. त्यांनी कायम मला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा दिला. मला मुलगी म्हणून नाही तर मुलगा म्हणून वाढवल. त्यांनी माझ्यावर कायम इतका विश्वास दाखवला की त्या विश्वसानेच मला कधी हारु दिलं नाही. आज मी जे काय आहे ते फक्त माझ्या पप्पानमुळेच आह. ते आहे म्हणून मी आहे त्यांच्या शिवाय मी काहीच नाहीये.
- विकास पांढरे,मुंबई
9970452767
(संपर्क -मयुरी खैरे,
8818839333





👍👍
उत्तर द्याहटवा
हटवाpandurang shinde thanks
Inspirational ..Nice.
उत्तर द्याहटवा