होळी हा सण जसा पौराणिक कथेशी निगडीत आहे तसाच कृषी संस्कृतीशी निगडीत आहे. आमच्या मराठवाड्यात होळीला 'शिमगा' म्हणतात. दिवशी कुणब्याच्या घरी 'मायर्हाणी' असते. कुणबी म्हणजे शेतकरी. 'मायर्हाणी' म्हणजे काळी आई. सुवासिनीची ओटी भरली जाते म्हणून तिला 'मायर्हाणी'म्हणतात.
शेतातून निघालेल्या धान्याची पुजा केली जाते आणि शिमग्याच्या दिवशी चुलीवर गहू भाजून , हा गहू जात्यावर भरडला जातो. गुळ आणि गहू यांचे मिश्रण केले (मराठवाड्यात याला साझुरा म्हणतात) जाते. या साझुऱ्याची पोळी केली जाते. मराठवाडा व सोलापूर भागात या पोळीला 'ठेलची'म्हणतात.
होळीला या ठेलचीचे नैवेद्य दाखवून पुजा केली जाते. त्यानंतर होळीला अग्नि दिला जातो. होळीतील गवरीच्या राखेवर खोबरे भाजून खाण्याची पध्दत आहे. शेतकरी बांधव ही परंपरा आजही जपतात. थंडीपासून रक्षण व्हावे, हा यामागील हेतू आहे. 'वेळ अमावस्येला' गावात आलेली थंडी शिमग्यापासून संपते.
यातील आणखीन एक मजेशीर गोष्ट अशी की, गावातील नागरिक आपले शरीर निरोगी राहावे, म्हणून होळीची राख अंगाला लावून स्नान करतात. ही प्रथा मी स्वतः लहानपणापासून जपत आलोय. शहरात आल्यानंतर मला या गोष्टीचा आनंद घेता आला नाही.
होळीचा सण संपला की, गावशिवारात ज्वारीच्या काढणीला वेग येतो. याकाळात थंडी ही दूर झालेली असते. पहाटेच्या वेळी शेतकरी बांधव आपल्या शेतात जाऊन ज्वारीची पात धरतो. सगळे शिवार शेतकऱ्यांनी फुलून गेलेले असते. ज्वारीची काढणी अगोदर मराठवाडा व बार्शी परिसरात 'डाव्हारा' करण्याची जुनी पध्दत आहे. डाव्हारा म्हणजे 'पशुबळी' देणे. 'ईडापिडा टाळो' म्हणून ही पध्दत आहे. काळाच्या आघोत ही प्रथा बंद पडत आहे. यामुळे अंधश्रद्धा दूर झाली आहे, असं म्हणता येईल
होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. पूर्वीच्या काळी आता सारखे रंगबेरंगी रंग नव्हते. त्यामुळे शिवारात बहरलेल्या पळसाच्या पानांचा रस एकत्र करून रंग तयार केला जायचा. हा रंग नैसर्गिक रंग असल्याने शरीरामध्ये शितलता निर्माण होते. शेतकरी बांधव दोन दिवस अगोदर पळसाच्या पाने तोडून, उखळात काढून रंग तयार करायचे.
धुलिवंदन आणि गावोगावच्या परंपरा
धुलिवंदन म्हणजे रंगाचा उत्सव. या उत्सवाचे आपल्या महाराष्ट्रातील काही गावामध्ये आगळेवेगळे वैशिष्ट आपणांस पहावयास मिळते. गावगाड्यातील चालीरीती,भाषा,तेथील संस्कृती यानुसार धुलिवंदन साजरी करण्याची परंपरा लाभली आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात धुलिवंदनाच्या दिवशी जावयांचीची गाढवावरून मिरवणुक काढण्याची ७५ वर्षाची परंपरा आहे. बारा वाड्या आणि तेरावे विडा अशी विडा गावाची ओळख आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर वडांगळी गावात गेल्या शंभर वर्षांपासून जावयाची धिंड काढण्याची आगळवेगळी परंपरा आहे. 'धुलिवंदन ते रंगपंचमी' अशा पाच दिवसांत गावातील जावयांची गाढवावरून वाजत गाजत धिंड काढली जाते.
अशीच परंपरा बारगाव नांदर ( ता.राहुरी जि.नगर) सुरु होती. या गावात अनेक वर्षांपासून जावयांची धिंड काढण्याची परंपरा होती. आजची सामाजिक व व्यक्तिगत जीवनमूल्ये बदलल्यामुळे ही प्रथा खंडित झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील 'भोयरे' गावात एकमेकांना दगड मारून रक्ताची धुळवड साजरी करण्याची अघोरी परंपरा आहे. यादिवशी दिवसभर गावातील तरुण दगड,गोटे गोळा करतात व संध्याकाळी एक गट देवीच्या मंदिरावर थांबतो व दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडांचा वर्षाव करून रक्तरंजित धुळवड साजरी करतात. ग्रामदैवत आई तुळजाभवानी मातेला आनंदी ठेवण्यासाठी ही परंपरा सुरु आहे.
सोलापूर शहरात रजपूत समाजाच्यावतीने धुळवडीनिमित्त रंगगाड्याची मिरवणुक काढण्याची अडीचशे वर्षापासून परंपरा आहे. बैलगाड्यांवर रंगाचे पिंप ठेवून रस्त्याच्या दुतर्फा रंग उडवण्याची ही प्रथा आहे
कोकणातील 'पिरकोन' या गावात धुलिवंदनाच्या दिवशी तळा मारण्याची प्रथा आहे. गावकऱ्यांना एकत्र करुन मत्स्योत्सव साजरी करणे म्हणजे तळा मारणे. तळा म्हणजे तलाव.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गाव धुळवडीनिमित्त पाटलांच्या मांडांवर शिमग्याचा खेळ करण्याची प्रथा आहे. हाहा पाच, सात, नऊ दिवस चालतो.
गुहागर - चिपळूण मार्गावरील उमराठ या गावात शिमगोत्सवात ग्रामदेवतांची रूपे श्री नवलाई मंदिरात लावली जातात. त्यानंतर पालखी सहाणेवर आणली जाते. पौर्णिमा व प्रतिपदा यामधील काळाला 'भद्रा' म्हणतात. त्यावेळी होम होतो. होमाची विभूती धुलिवंदनाच्या दिवशी ढोलाच्या तालावर गावात घरोघर फिरते. त्यानंतर भराडा भेटीचा कार्यक्रम रंगतो.
नंदुरबार, यवतमाळ, अमरावती,नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बांधव होळी सण मोठ्या भक्तिभावात साजरा करतात.
घुंगरू, मोरपिसांचा टोप, ढोलकी, मोठा ढोल, बासरी, शस्त्र असा साज परिधान करून आणि अंगावर विविध रंगांचे नक्षीकाम करून होलिकोत्सवात सामील झालेले आदिवासी बांधव येणाऱ्या प्रत्येकाला भूरळ घालतात.
बंजारा समाजातही धुळवड साजरी करण्याची मोठी परंपरा आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात रंगाविना धुलिवंदन साजरे करणारे गाव म्हणून वर्धा जिल्ह्यातील 'सुरगाव' या गावाची ओळख आहे. गेल्या दोन दशकांपासून या गावाने आपली आदर्शवत परंपरा जोपासली आहे.
नाथपंथांमधील प्रमुख नाथ असलेले कानिफनाथ महाराज यांच्या मढी (जि.नगर) येथे शिमगोत्सवात यात्रेला प्रारंभ होतो. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे भटक्या जमातीच्या 'जातपंचायती' येथे भरतात.
एकूणच शिमगा हा सण विविध अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण कसा आहे याचे दर्शन होते, हेच भारतीय संस्कृतीचे आगळेवेगळे रूप आहे.
© विकास पांढरे,९९७०४५२७६७

![]() |
| वडांगळी गावात गेल्या शंभर वर्षांपासून जावयांचीची धिंड काढण्याची आगळवेगळी परंपरा आहे. |

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा