आज कृषी दिन म्हणजे आमचा दिवस. शेतकरी पुत्र म्हणून काळ्या आई विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे कर्तव्यच आहे आणि ती असायलाच पाहिजे. आज शेतीबाबतच्या अनेक जुन्या आठवणी सरींसारख्या बरसू लागल्या आहेत. शेती आणि माझं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. सध्या गावाकडे खरीप पेरणी उरकली आहे पण काही दुर्मिळ बी-बियाणे नष्ट होत असल्याचे चित्र आहे.
.......................................
उथळ व कुसळी गवताचा तालुका म्हणजे तुळजापूर. बोरी नदीमुळे काही भाग ओलिताखाली आला असला तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे काही प्रमाणात प्यायला पाणी मिळणे मुश्कील. भौगोलिक स्थिती, हवामान स्थितीचा विचार केला असता या भागात तूर,सोयाबीन, उडीद ही खरीप तर ज्वारी हे रब्बीचे मुख्य पीक घेतले जाते. या भागातील शेती ही संपूर्णपणे पावसावरच अवलंबून आहे. तंत्रज्ञान आणि रसायनिक खतांमुळे कुसळे नष्ट झाली ही चांगली बाब.
............................
शेतकरी आणि पावसाचं एक जिवाभावाचं नातं आहे. मे महिना आला की शेतकरी वाट पाहू लागतात गार गार वार्याची, मातीला सुगंध देणार्या पहिल्या सरीची.. मी बघतो तसा आमची शेती पूर्णपणे शेतीवरच अवलंबून. पावसाळा सुरू झाला की खरीप पेरणीची लगबग असायची. या काळात सर्व जण पेरणीत अडकल्याने माझ्यावर शाळेला दांडी मारून जनावरांची राखण्याची वेळ यायची. पावसाळी दिवस.. धरत्रीचा हिरवा शालू..ससे,घोरपड, मोर,काळवीट, हरीण हे वन्यजीव बाहेर पडायचे.. त्यात जनावरांच्या गळ्यातील घंटीचा आवाज... आंब्याच्या झाडांवर खेळलेला सूर पारंबा... ओढ्याला आलेले मासे..ते पकडून केलेली पार्टी.. तळ्यात मनसोक्त पोहण्यातला आनंद औरच होता... राही जांभळ खाण्यासाठी शाळेला मारलेली दांडी.. मास्तराचा मार..
......................................
आमच्या शेताची खास बात म्हणजे साळी. साळीचं तीन पोते बी पेरणीसाठी लागयाचे. त्यासाठी आमच्या वडिलांची व काकांची महिनाभर राब चालयची. साळी म्हणजे तांदूळ. आमचं हे मुख्य पीक असल्याने सगळीजणे लक्ष द्यायचे. गावातही ८० टक्के शेतकरी साळी पेरायचे. आमच्या कुटुंबासह साळी, राळं ( भगरी सारखा पदार्थ) हुलगा, आंबडी, लहान कारळं, मठकी, जवस, तूर, तीळ आदी देशी बियाणाची पेर व्हायची.. देशी साळीचा भात आणि दुधाची चवच न्यारी होती. सकाळ व दुपार यावरच ताव मारायची. सोबत जवसाची चटणी, आंबड्याची भाजी असायची...
....................................
गेल्या दहा बारा वर्षापासून साळीचे क्षेत्र आमच्यासह गावातील सर्व शेतकऱ्यांनी शून्यावर आणले आहे. हुलगा, जवस,लहान कारळं,आंबडी,राळं, बाजरी, मूग, हायब्रीड (महाबीज) तीळ ही धान्ये नामशेष झाली आहेत. लहानपणी ही सर्व पीके शेतात दिसायची. हुलगा तर केव्हाच बुडाला.... महाबीजची पिशवी म्हणजे आमचं शाळेचं दप्तर असायचं. पिशवी साठी आमच्या भावडाचं भांडण लागयचं. शालेय शिक्षण संपेपर्यंत महाबीजची पिशवी प्रिय असायची...
......................................
पारंपरिक शेतीत मिश्र पिके घेतली जात. पाऊसपाण्याने दगा दिला, हवामान बदलले तरी त्याचा फटका सगळ्या पिकांना बसत नसे. मिश्र पिकांमधील काही पिके त्यातही तग धरत असतं. त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येत नसतं.
...….......................
आंबडी,मटकी, कारळाची जागा सोयाबीन व उडदाने घेतली आहे. आज शेती क्षेत्रात बदल होत आहेत.योग्य पिकांची निवड आणि सिंचनाच्या काटेकोर पद्धतीवर लक्ष द्यावे लागत आहे.गेल्या अर्धदशकात स्वीकारलेल्या तंत्रज्ञानाचा तत्कालिक लाभ झाला. म्हणजे काही काळ कृषी उत्पादन वाढत गेले परंतु त्या पातळीवर ते दीर्घ काळ टिकून राहिले नाही. पारंपरिक बि-बियाणांची जाती-प्रजाती आपण नष्ट करून बसलो आहोत. यापुढे शेतीमध्ये शाश्वततेचा विचार प्राधान्याने करणे आवश्यक आहेच शिवाय देशी बि-बियाणे टिकवण्यासाठी पुढे आले पाहिजे.
..............................
पत्रकारितेत आलो तेव्हा शेती विषयाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. सरकार कुणाचेही असो शेतीच्या सकारात्मक बातम्या प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला. सोलापूरच्या ज्वारी,डाळिंब व मराठवाड्यातील केशर आंब्याला केंद्र शासनाचे जीआय मानांकन मिळाले. तेव्हा या तीन्ही बातम्या दिलेल्या महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार असल्याचा मला अभिमान वाटतो.भविष्यात ही सकारात्मक बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
( टीप : वरील उपस्थित झालेले प्रश्न माझे वैयक्तिक व गावापुरते मर्यादित आहेत.)
©विकास पांढरे, सा.विवेक, मुंबई
९९७०४५२७६७

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा