मराठेशाहीतील कर्तबगार स्त्रियांची पाने अंधुकच राहिलेले दिसून येतात. या शाहीने राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, झाशीची राणी या कर्तबगार महिलांबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा इतिहास अद्यापही अज्ञात आहे. एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास वाचकांसमोर आणण्याचे कार्य आमचे पत्रकार मित्र उज्ज्वलकुमार माने यांनी 'रणरागिनी अहिल्यादेवी' या ग्रंथाद्वारे केले आहे.
माने हे हाडाचे पत्रकार, उपसंपादक. लोकशाहीच्या चौथा स्तंभात ते प्रदीर्घ अशी सेवा करीत आहेत. 'पोलिस आणि पत्रकारिता', पोलिस आणि जनता' आणि पोलिस हेल्पलाईन 'अशी माने यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'रणरागिनी अहिल्यादेवी' या ग्रंथाची तिसरी आवरुती प्रकाशित झाली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावरील अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. पण अहिल्यादेवीच्या समग्र जीवनाचा परामर्श घेणारा ग्रंथ उपलब्ध नव्हता. माने यांनी अनेक संदर्भ साहित्याचा सखोल अभ्यास करून सामान्य वाचकांला पचनी पडेल या हेतूने ग्रंथाची निर्मिती केली आहे. अहिल्यादेवीचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.
हा कालपट सांगण्याबरोबर माने यांनी मराठेशाहीतील पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांच्या जीवनाचा थोडक्यात परामर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे. मल्हाररावांचा बुंदेलखंडावर कब्जा,रोहिले,जाट,मराठे आणि शीख कसे एकत्र आले होते हे प्रकरणातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पती खंडेराव होळकर युद्धात मारल्या गेल्या नंतर सती जाणाऱ्या अहिल्येस सासऱ्याने थोपविले.राज्यकारभाराचे धडे दिले. आणि स्वत:च्या निधना अगोदर राज्य त्यांच्या हाती सोपविले. अहिल्यादेवीने अखंड २८ वर्षे राज्य कारभार चालविला. दरबारात जातीने बसवून अनेक कामे त्या हाता वेगळी करीत. शत्रू देखील त्यांच्या बद्दल आदर बाळगीत असत. भ्रष्ट झालेल्या मंदिरांची पुर्नबांधणी,जीर्णोद्धार, देवतांची प्रतिष्ठापणा, घाट -रस्ते, धर्मशाळा बांधणे, अन्न छत्रे चालविणे या लोककल्याणकारी कामामुळे भारतात व महाराष्ट्रात त्यांचे नाव अजरामर झाले आहे.
अहिल्यादेवी आचरणाने अत्यंत पवित्र स्वभावाने स्वाभिमानी, राजकारणात दक्ष, व धर्मकारणात सर्वस्व दानी होत्या.त्यांनी सोरटी-सोमनाथ, काशी-विश्वनाथ अशा भ्रष्ट मंदिरांची पुनु निर्मिती व देवताची प्राण प्रतिष्ठा केली.
अहिल्यादेवीने अनेक लोकोपयोगी कामे करून जनतेचे मने जिंकली. नर्मदा नदीच्या तीरावर महेश्वर येथे राजधानी हालविली. भारतात सुमारे २५ ठिकाणी अहिल्यादेवींनी शिवालयाची निर्मिती केली. पंढरपुरात होळकर वाडा बांधला. अनेक ठिकाणी दगडी विहीर बांधल्या. पशू -पक्ष्यांसाठी पिके विकत घेतली. पर्यावरणाच्या बाबतही अहिल्यादेवींचा दूरदूष्टीपणा होता. प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान २० झाडे लावली पाहिजेत असा त्यांचा हुकूम होता. विनापरवाना झाडे तोडणाऱ्यांना जबर शिक्षेची तरतूद होती. अहिल्यादेवी इंग्रजाची चाल ओळखून होत्या. त्यासाठी महादजी शिंदे यांना पुणे दरबारी जाऊन इंग्रजाविरूध्द योजना करण्यासाठी आग्रह धरला होता. अहिल्यादेवी या सर्वगुण संपन्न होत्या. त्यांचे मोडी लिपीतील हस्ताक्षर हे सुंदर हस्ताक्षराचा नमुना होय.खरेदी व्यवहारात अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र समजला जाणारा सातबारा उतारा अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातच निर्माण झाला. त्यांनी शत्रूंशी लढा देण्यासाठी महिलांची विशेष फौज तैनात केली होती. अनेक लढाया त्यांनी केल्या व जिंकल्याही.
लेखक उज्ज्वलकुमार माने यांनी आपल्या 'रणरागिनी अहिल्यादेवी' या ग्रंथात अहिल्यादेवीच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भातील काही निवडक पत्राचा माने यांनी ग्रंथात समावेश केला आहे. होळकर घराण्यातील नातीगोती व संपर्कात आलेल्या प्रमुख व्यक्तींचे नावे दिली आहेत. त्याचबरोबर कारभारी, होळकर राजघराण्याची वंशावळ होळकर घराण्याशी संबंधित छायचित्रे दिली आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना अधिक पसंतीस उतरले आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्शवत कार्य लक्षात घेऊन माने यांनी या ग्रंथाची निर्मिती केली आहे.
परीक्षण - विकास पांढरे, सोलापूर ९९७०४५२७६७
ग्रंथ :रणरागिणी अहिल्यादेवी
लेखक : उज्ज्वलकुमार माने -९९२२४२४६१९
प्रकाशन
यशोदिप पब्लिकेशन्स
२१७ ब,जोरी निवास,नारायण पेठ, पुणे -४११०३०, ९८५०८८४१७५
पाने :११२, मूल्य : ११०/-