कथा,कादंबरी म्हटले की,नायक,नायिका अशी पात्रे येतात. पण ती काहीशी काल्पनिक असतात. धीरोदात्त पात्रे एकूण कलाकृतीला न्याय देत असतात. परवा आमचे मार्गदर्शक मित्र,विवेकचे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांचे 'आयाबाया' हे पुस्तक वाचत होतो. सव्वाशे पानाचे हे पुस्तक वाचून क्षणभर गहिवरल्या सारखे झाले. कारण या पुस्तकातील धीरोदात्त नायिका या गावकूसाबाहेरच्या आहेत.भटक्या समाजातील स्त्रियांचे जीवन म्हणजे किड्यामुंगासारखेच. पण काही स्त्रिया परिस्थितीला तोंड देत समाजाला आशेचा नवा किरण दाखवतात. गोळे यांचे आयाबाया' हे पुस्तक म्हणजे भटक्या जाती - जमातील महिलांच्या वेदनेची व कर्तृत्वाची गाथा होय.
महाराष्ट्रभर भ्रमंती करून भटक्या समाजाचे चित्र मराठी पत्रकारितेत आणि साहित्यात आणण्याचे कार्य करणारे पत्रकार-लेखक फार क्वचितच आढळतात. त्यामध्ये रवींद्र गोळे यांचे नाव प्राधान्य क्रमाने घ्यावे लागेल. मराठी साहित्यात आजपर्यंत न हाताळलेला विषय रवींद्र गोळे यांनी आपल्या साहित्यातून वाचकांसमोर आणला आहे.
उजव्या विचारात जडणघडण झालेल्या रवींद्र गोळे यांच्या पत्रकारितेची सुरुवात सा.विवेक पासून झाली. सध्या ते सा.'विवेक'चे सह कार्यकारी संपादक आहेत. दरम्यानच्या काळात त्यांचा भटके- विमुक्त विकास परिषदेच्या अनेक प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला. पालावरची शाळा असो वा पालात राहणाऱ्या प्रत्येक समाज घटकांशी त्यांचा संबंध आला.
महाराष्ट्रात भटक्या-विमुक्तांच्या ४२ जमाती आणि त्यांच्याही सुमारे साडेतीनशे पोटजाती आहेत. यांना ना हक्काची जमीन आहे ना घर, पाठीवर बि-हाड घेऊन गावोगाव भटकणाऱ्या या लोकांच्या जगण्याची परवड अजूनही थांबलेली नाही. भटक्या-विमुक्तांच्या काही जमातींवर बसलेला गुन्हेगारीचा शिक्का अद्यापही पुसला गेलेला नाही. याच धरत्रीचे पुत्र असूनही नागरिकत्वाची ठळक ओळख त्यांच्यापाशी नाही. राजकीय उपेक्षा, पोलिसांचा जाच, याबरोबरच जात पंचायतींसारख्या रूढी-परंपरा यांच्या कोंडीत सापडलेल्या या समाजाच्या दैन्यावस्था अजूनही संपल्या नाहीत. या समाजातील स्त्रियांचे दु:ख ही भेदक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हा भटका समाज मूळ प्रवाहात येत आहे. शिक्षण,स्वावलंबन,सन्मान आणि सुरक्षा याची जाणीव या समाजाला करून देण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यशस्वी झाला आहे हे रवींद्र गोळे यांनी आपल्या 'आयाबाया' ग्रंथातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
भारताबाई देवकर, सखुबाई बंडीधनगर, जयश्री भोसले, राजश्री काळे, कांचन मालन काळे, सुजाता गणवीर, सरस्वतीबाई माने, समूध्दी काळे आणि अयोध्याबाई उपाध्ये या नवदुर्गेची गाथा 'आयाबाया'त आली आहे. यात केवळ त्यांनी आयुष्यात भोगलेल्या दु:खाच्या करुण कहाण्या नाहीत तर राखेतून उठलेल्या फिनिक्स पक्ष्याच्या भरारीचे ते सामाजिक दस्तऐवज आहेत. भटके-विमुक्त समाजातील स्त्रियांच्या संघर्षांचे अत्यंत सखोल चित्र रवींद्र गोळे यांच्या या पुस्तकात पाहायला मिळेल.
नवऱ्यानं डोक्यात दगड घातला म्हणून तान्हय़ा बाळासह घर सोडून आलेल्या भारतबाई. आज तुळजापूर शहराच्या स्वच्छतेचं स्वप्न पाहताहेत. त्याच्या पूर्ततेसाठी गेली अनेक त्या अनवाणी फिरत आहेत. शाळेचं तोंडही न पाहिलेल्या या बाईंना सगळा हिशेब, व्यवहार तोंडपाठ असतो. तुळजापुरात बचत गट सुरू करून अनेकींना रोजगारातून स्वत:च्या पायावर उभ्या राहायला शिकवणाऱ्या, शहर स्वच्छतेसाठी तुळजापुरात घंटागाडय़ा सुरू करणाऱ्या भारतबाई देवकर यांचा जीवनपटाला लेखक रवींद्र गोळे यांनी आपल्या'आयाबाया' पुस्तकात प्रथम स्थान दिले आहे.
वडार समाजात जन्माला आलेल्या भारतबाईचा संघर्ष वेदनादायक आहे. नवऱ्याला तिनं सोडले असले तरी स्वाभिमान सोडला नाही. कधी सूतगिरणीवर तर कधी तुळजापूराच्या आसपास खडी फोडून दिवस काढलेल्या भारतबाईला आधार मिळाला यमगरवाडीत. वडारजातील एका मुलीला शाळेत घालण्यासाठी भारतबाई यमगरवाडीला पोहोचल्या.त्या मुलीचा प्रवेश झाला. भारतबाई कायमच्या भटक्या विमुक्त विकास परिषदेच्या जोडल्या गेल्या. इथेच त्यांना बचतगटाची माहिती मिळाली. भारतबाईचा स्वभाव आणि कामाबद्दलची आत्मियता पाहून त्यांना यमगरवाडी प्रकल्प समितीचे सदस्य करण्यात आले. पुण्याला भटके विमुक्त विकास परिषदेची एक बैठक दादा इदातेंच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या बैठकीत भाळतबाईच्या नावाची भटके -विमुक्त विकास परिषदेच्या उपाध्यक्षा म्हणून केली गेली. भारतबाई म्हणजे हाती घेतलेले काम तडीस नेणारी बाई. आपल्या आयुष्यातील दु:ख विसरून त्या नव्या दमाने आणि उमेदीने जीवनाची वाट चोखाळत आहेत. बचत गट असो वा तुळजापूर शहर स्वच्छ करण्याचा नित्यक्रम कसा आदर्शवत आहे हे लेखक गोळे यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून सांगितले आहे.
गोपाळ म्हणजे कृष्णाचे वंशज. काळाच्या ओघात भीक मागून जगतोय. खेळकरी, पैलवान, डोंबारी अशी अनेक नावे असलेल्या या समाजातील एका सखूबाई बंडीधनगर या महिलेने लातूर जिल्ह्यातील अनसरवाडा गावात आपल्या अद्वितीय कामामुळे नवी उमेद निर्माण केली आहे.
आयुष्यातील पन्नास वर्षे काढल्यानंतर या आपण आपल्याच समाजासाठी काही तरी करावे,असे सखुबाईला वाटले. बघताबघता समाजातील ७२ कुटुंबांना स्वतःचे घर मिळाले. आज ती साडेतीनशे जणांची ती "माई' झाली आहे. सखूबाई तुकाराम बंडीधनगर यांनी आपल्या समाजाला आशेचा नवा किरण दाखविला आहे. सखूबाईंमध्ये बदल घडण्यास निमित्त ठरले भटक्या विमुक्तांसाठी काम करणारे गिरीश प्रभुणे, नरसिंग झरे आणि तुळशीराम गरगटे. नातेवाईकाच्या तुकडाभर जमिनीच्या आधारावर सखूबाई लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अनसरवाडा इथे आल्या. भटकें जगणे सोडून द्यायचे तर पोट भरण्यासाठी हाताला काम हवे. त्याची सुरवात सखूबाईंनी शेतमजुरीने केली. तेव्हापासून स्वतः शिकणं आणि आपल्या समाजातील महिलांना शिकविणे असा नित्यक्रम सुरू झाला.

जीवनाला स्थिरता मिळत असल्याचे पाहून अनसरवाड्याच्या वस्तीवर गोपाळ खेळकरी समाजाच्या कुटुंबांची आणि महिलांची संख्या हळूहळू वाढू लागली. तेव्हा सखूबाईंनी स्वयंसहायता गटाची स्थापना केली. महिलांनी रोजच्या मजुरीतून एक रुपया बचतीला सुरवात केली. सखूबाईंनी अनेक महिने, विविध पद्धतीने समजावून सांगितल्यानंतर पुरुष मंडळी वाद्य वाजविण्याचे प्रशिक्षण घेण्यास तयार झाली. यामुळे आज वस्तीवर मोठे दोन वाजंत्री गट आहेत. हैदराबाद, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये येथील मुले वाद्य वाजविण्यास जातात.ठिकठिकाणी जाऊन वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण सखूबाईंनी स्वतः घेतले. त्यानंतर त्यांनी वस्तीवरील महिलांना पायपुसणी, माळा, दोरखंड, तरट्या, दाळी आदी वस्तू बनविण्यास शिकविल्या. भीक मागून खाणाऱ्या महिलांना वस्तीवरच महिनाकाठी साडेतीन हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याची सोय केली. बघता बघता गोकुळ महिला उत्पादन केंद्र सुरू करून महिलांमध्ये आत्मभान निर्माण केले आहे. चौथीपर्यंत शिकलेल्या सखुबाईना विविध भाषा अवगत आहेत. महिला प्रशिक्षणासाठी सहा महिने परगावी राहिल्यामुळे (जातीबाहेर जाऊन ज्ञान घेतल्याबद्दल) सखुबाईवर जातीने बहिष्कार टाकला होता. जातपंचायतीत दंड भरल्याशिवाय तिला जातीत घेतले जात नव्हती. नरसिंग झरेंच्या मदतीने ती या समस्येतून कशी बाहेर पडली याची उत्कंठावर्धक कथा गोळे यांनी शब्दबध्द केली आहे.
आजच्या काळातही पारधी समाज हा मुख्य प्रवाहापासून कोसोदूर आहे. या समाजाची आजही परिस्थितीत बदलली नाही. ना हक्कांचे घर आहे ना जागा, कोणतेही अघटित घटना घडली की पोलीसांची नजर या समाजाकडे जात असते. अशा या वंचित समाजातील स्त्रियांची अवस्था तर फार बिकट आहे. त्याचबरोबर हा समाज रूढी, समजुती, अंधश्रद्धांच्या प्रभावात आदिम जीवन जगत आहे. पारधी समाजातील स्त्रियांच्या वाट्याला आलेले अंधारमय आणि प्रकाशमान जीवनाची यशस्वी गाथा लेखक रवींद्र गोळे यांनी जयश्री भोसले व राजश्री काळे या दोघींच्या माध्यमातून समोर आणली आहे. राजश्री काळे ही सध्या पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सातची नगरसेविका आहे.पारधी समाजातील ती पहिली नगरसेविका आहे.
जयश्री- कस्तुऱ्याची कहाणी चित्तथरारक आहे. या दोघांच्या लग्नाला आठ दिवस झाले नसतील,अचानक पालावर पोलिसांची पालावर धाड पडते अन् कस्तुऱ्या जेरबंद होतो. जो गुन्हा त्यांनी केला नाही त्याची शिक्षा कस्तुऱ्याला भोगावे लागते. अशावेळी जयश्रीची झालेली परवड अंगावर शहारे आणणारे आहे. गावकुसाबाहेर जीवन जगत असलेला हा समाज सामाजिकदुष्टा सुरक्षित नाही. जीवनाची फरफट करत जयश्री आणि कस्तुऱ्या नळदुर्ग जवळील सिंदगाव इथे येतात. पण नियती मात्रं जयश्रीला साथ देत नाही. काही नराधम जयश्रीला आपल्या वासनेची शिकार बनवतात.

क्रूर समाजाने उघड्यावर टाकलेली, असहाय, फाटक्या कपड्यातली, जयश्रीची वेदना समजू शकली नाही.
बलात्कार झाला. पारध्याची बाई बाटली.. अन् पुन्हा सुरू होते जयश्रीच्या जीवनाची फरफट. जयश्रीला जातीबाहेर फेकण्याचा प्रकार सुरु असतो,तर दुसरीकडे कस्तुऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांचा ससेमिरा. यावेळी या अभागी नवदाम्पत्याच्या झालेल्या ससेहोलपटाची कुणालाही दया येत नाही.
जयश्रीच्या जीवाला कस्तुऱ्या तेवढाच आधार तर होता..त्याला औरंगाबादच्या जेल मध्ये डाबण्यात आले...तिच्या जीवनाची फरफट थांबली ती यमगरवाडीला आल्यावर... गिरीश प्रभुणे काकांनी तिला आधार दिला. तिचा जीव यमगरवाडीत रमू लागला. तिचे पिल्ले ही यमगरवाडीत शिकू लागली. पुढे तिला बचतीचा मार्ग सापडला. भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा रावळ यांनी जयश्रीला बचतीचे अर्थशास्त्र सांगितले. जयश्रीने जे आयुष्य भोगले त्यापासून मुक्ती मिळाली होती. जयश्रीच्या जीवनात झालेला हा बदल संघविचारातून सुरू झालेल्या परिवर्तनाच्या कार्याच्या पाऊलखुणा आहेत.
यमगरवाडी हे भटके-विमुक्त समाजाचे माहेरघर. पारधी समाजात गायपारधी व गावपारधी दोन पोटजाती आहेत. राजश्री काळे ही गायपारधी. तिला धरून पाच बहिण आणि एक भाऊ. राजश्रीच्या बापाला ज्या वर्षी सजा झाली त्याच वर्षी तिचं लग्न झालं ते ज्ञानेश्वर भोसले. तो गावपारधी तर राजश्री गायपारधी. दोघांत सोयरिक होत नाही. पण नियतीने या दोघांचा योग जळवून आणला. ज्ञानेश्वर काही दिवस दारु भट्टी चालवून संसार चालवू लागला. अशावेळी गावपारध्याने गायपारध्याची बाईल केली ?म्हणून पारधी समाज खवळला.
राजश्रीची चौथीनंतर शाळा थांबलेली होती.शिकण्याची जिद्द असूनही मार्ग सापडत नव्हता. अशावेळी प्रभुणेकाका,गडेकर गुरुजी, व्हटकर याची राजश्री शी भेट झाली. ती यमगरवाडीत शिकू लागली. ज्ञानेश्वरने देखील तिला साथ दिली. प्रभुणे काकांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रशिक्षण घेतले. पुढे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून तिने शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात तिला शिपायाची नोकरी मिळाली. दरम्यान काळात तिला मुलगी का झाली म्हणून ज्ञानेश्वरने माणसात शिवीगाळ करून मारहाण केली.आज राजश्रीच्या जीवनात विविध परिवर्तन झाले आहेत. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे महानगरपालिकेची नगरसेवसिका आहे.
लेखक रवींद्र गोळे यांनी आपल्या 'आयाबाया' या पुस्तकात विविध स्त्रियांचे दर्शन घडवले आहे.यामध्ये सरस्वती माने या महिलेची कथा सांगितली आहे. सरस्वती या यमगरवाडी प्रकल्पातील प्रथमापासूनचे कार्यकर्ते तुकाराम माने यांच्या सौभाग्यवती. एकदा प्रकल्पातील पोरांनी शेतातले धान्य चोरले म्हणून गावकऱ्यांनी मुलांना डांबून मारले. फार विणवणी करून ही गावकरी शांत होत नसल्याचे पाहून सरस्वती बाईने आपला दुर्गावतार दाखवला. त्यामुळे मुलांना सरस्वतीबाई बद्दल आदर आहे तितकच ममत्व देखील. सरस्वतीबाई या स्वयंपाक विभाग सांभाळतात.
लेखक गोळे यांनी कांचन काळे, सुजाता गणवीर, समूध्दी काळे आणि अयोध्याबाई आराध्ये यांची जीवनगाथा
मांडली आहे. सामाजिक इतिहासात उतरंडीच्या तळागाळाशी असलेली स्त्री अज्ञान, दारिद्रय़, अत्याचार, अंधश्रद्धा यांनीच केवळ पिचलेली नव्हती तर दुहेरी दडपणाची ती बळी होती. अस्पृश्य म्हणून पुरुषांबरोबरच समाजाकडून अवहेलना, हेटळणी, तुच्छता सहन करणारी आणि दुसऱ्या बाजूला स्त्री म्हणून कुटुंबात पुरुषप्रधानतेकडून सतत अत्याचार सोसणारी. तरीही ही स्त्री दुबळी, रडवी, हातपाय गाळून बसणारी कधीच नव्हती. सतत कष्ट करणारी, अन्याय अत्याचाराला खंबीरपणे आणि कणखरपणे तोंड देणारी आणि प्रतिकूल परिस्थितीत तगून राहणारी आहे. हे रवींद्र गोळे यांनी आपल्या 'आयाबाया'तून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
© विकास पांढरे, सा.विवेक मुंबई
मो.नं.९९७०४५२७६७, ८२०८६६९८९३
आयाबाया
लेखक -रवींद्र गोळे
मो.नं.९५९४९६१८६०,९८६९८१३२२८
प्रकाशक
स्वाती जोशी
परम मित्र पब्लिकशन्स ६,राजदुर्गा,बी कँबीन रोड,नौपाडा, ठाणे ( प.)४००६०२
मो.नं.९९६९४९६६३४