शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

अविस्मरणीय क्षण


१७ सप्टेंबर २०१७ हा माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस.ध्यानी-मनी नसताना काही महनीय व्यक्तींना भेटण्याचा, बोलण्याचा, त्यांच्यासोबत उभे राहण्याचा योग आला.निमित्त होते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे. मराठवाडा जन-विकास परिषद,ठाणे यांच्यावतीने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यात माझा ही सत्कार करण्यात येईल, अशी कल्पना नव्हती. 
राजीव कुलकर्णी (सहसंपादक, लोकसत्ता, मुंबई मूळगाव नांदेड) यांच्यामुळे परिषदेची ओळख झाली. परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, सह कोषाध्यक्ष डॉ. संतोष कदम हे माझ्याच तालुक्यातील ( ता.तुळजापूर)असल्याने परिचय वाढला. परिषदेच्या कामाशी माझा अप्रत्यक्ष सहभाग होता. तरीही समितीने मला व्यासपीठावर बोलावून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते व विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खा.राजन विचारे, पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने, नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे आदी मान्यवरांच्या उपस्थित माझा सन्मान करण्यात आला.
हा सोहळ्यास माझे शेतकरी आईबाप उपस्थित असते तर हा क्षण आणखीन द्विगुणित झाला असता. रंगायन (राम गणेश गडकरी) सभागृह भरून आल्यासारखे वाटले असते.
माझ्या सत्काराबाबत कुणाकडे उच्चता ही केली नाही, मला ते आवडत ही नाही. पण काही मित्रांनी फेसबुकवर फोटो शेअर करण्याचा आग्रह धरला.त्यामुळे हा प्रपंच. मला मुंबईत येऊन तीन साडेतीन महिने झाले नसतील, मुंबईची मला तितकीशी ओळख ही नाही. पण मातीच्या माणसांनी मला एवढ्या अवाढव्य गर्दीत शोधले आणि मोठ्या सन्मानाने सत्कार केला. हे माझे भाग्यच. दरम्यान,माझा सत्कार होतोय,काही क्षण मला कळलच नाही. माझ्या डोळ्यातून पाणी येत होते. सभागृहाच्या बाहेर येऊन थोडा वेळ अश्रूंना जागा करून दिली. 

हा सन्मान माझ्या मातीचा आहे. त्यामुळे हा सन्मान आत्महत्या केलेल्या माझ्या शेतकरी बांधवांना अर्पण करतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...